टीम AM : स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर आला आहे. नुकताच मंत्रीमंडळाचा विस्तार झाला आहे. मात्र, पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. त्यातच स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री झेंडावदन करत असतात. मात्र, पालकमंत्री निश्चित नसल्याने राज्य सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे.
राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, मंत्री अदिती तटकरे या पालघर येथे झेंडावंदन करणार आहेत. तर रायगड येथे जिल्हाधिकारी झेंडावंदन करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर अजित पवार कोल्हापूर येथे झेंडावंदन करणार आहेत.
झेंडावंदन करणाऱ्या नेत्यांची यादी पुढील प्रमाणे
देवेंद्र फडणवीस – नागपूर
अजित पवार – कोल्हापूर
छगन भुजबळ – अमरावती
सुनील मुनगंटीवार – चंद्रपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दिलीप वळसे पाटील – वाशिम
राधाकृष्ण विखे पाटील – नगर
गिरीश महाजन – नाशिक
दादा भूसे – धुळे
गुलाबराव पाटील – जळगाव
रवींद्र चव्हाण – ठाणे
हसन मुश्रीफ – सोलापूर
दीपक केसरकर – सिंधूदूर्ग
उदय सावंत – रत्नागिरी
अतूल सावे – परभणी
संदीपान भुमरे, – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदूरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराजे देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ
धनंजय मुंडे – बीड
धर्मराव अत्राम – गडचिरोली
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
संजय बनसोडे – लातूर
अनिल पाटील – बुलडाणा
अदिती तटकरे – पालघर
रायगड – जिल्हाधिकारी
हिंगोली – जिल्हाधिकारी
वर्धा – जिल्हाधिकारी
गोंदिया – जिल्हाधिकारी
भंडारा – जिल्हाधिकारी
अकोला – जिल्हाधिकारी
नांदेड – जिल्हाधिकारी
विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.