विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे, विजय वडेट्टीवार यांची निवड

टीम AM : विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विधिमंडळ पक्ष नेतेपदी बाळासाहेब थोरात राहणार आहेत, असा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. 

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामे झाले होते. यानंतर काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्याची संधी आली. 

यावेळी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांच्या नावांवर चर्चा रंगली होती. पण अखेर विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.