टीम AM : राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशातील अन्य महापुरुषांबद्दल अपशब्द वापरून त्यांचा अवमान करणाऱ्या वाचाळवीर संभाजी भिडे याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्या वतीने एका निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अवमान करणाऱ्या संभाजी भिडेचा जाहीर निषेध करण्यात आला.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अपशब्द काढुन लोकभावना दुखवणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे याच्यावर गुन्हा दाखल आहे. परंतू त्याला अद्यापही अटक करण्यात आलेली नाही. अशा विर्कृत स्वभावाच्या माणसाला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी संभाजी भिडेच्या प्रतीमेस जोडे मारुन तीव्र निषेध केला. याप्रसंगी माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी सभापती अमर देशमुख, व्यंकटेश चामनर, ताणबा लांडगे, माजी सरपंच कल्याण भिसे, बालाजी शेरेकर, शेख मुनवरभाई, हामीद चौधरी, सिद्धू लोमटे, मिलिंद बाबजे, रणजित मोरे, गोविंद टेकाळे, अंकुश ढोबळे, सुधाकर जोगदंड, रामराव आडे, धनराज सोनवणे, प्रसाद पताळे, यशोधन लोमटे, सागर माने, पारस कुरील, खाजा चौधरी, गफ्फार पप्पुवाले, वैजनाथ राठोड, रमेश राठोड, गणेश घाडगे, शेख कलीम, पठाण ईम्रान, चौरे मंगेश, वैभव पाटील यांच्यासह आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.