पालघर येथे जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार : चार जण ठार

टीम AM : पालघर येथे जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी पहाटे 5 च्या सुमारास घडली. आरपीएफ हवालदाराचा प्रवाशांशी वाद झाल्याने त्याने रागाच्या भरात गोळीबार केला. 

या घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर काही प्रवासी जखमी झाले आहेत. हल्लेखोर जवानाला अटक करण्यात आली आहे.

आरपीएफ हवालदार चेतन सिंह, असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. हा प्रकार जयपूर एक्सप्रेसच्या बी – 5 या बोगीमध्ये घडला. दरम्यान, ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. मृतांमध्ये आरपीएफचा अधिकारी आणि तीन प्रवाशांचा समावेश आहे.