शिक्षिका आणि खिचडी शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुफान हाणामारी : व्हिडिओ झाला व्हायरल

टीम AM : सोशल मीडियावर दररोज नव – नवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. अशातचं आता बीड जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील जोडहिंगणी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यात एक महिला शिक्षिका आणि भात शिजवणाऱ्या महिलेमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचं पाहायला मिळत आहे.

पालकांनी मध्यान्न आहाराबद्दल तक्रारी केल्यानंतर शिक्षिकेने भात शिजवणाऱ्या महिलेकडे यासंदर्भात जाब मागितला. त्यानंतर संतापलेल्या महिलेने शिक्षिकेला मारहाण केली. हा वाद इतका विकोपाला गेला की, नंतर दोघींनीही एकमेकींचे केस ओढले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.