शासकीय नोकरीची संधी : महाराष्ट्र राज्य नगर परिषद गट – क संवर्गातील 1872 पदांकरिता मेगाभरती

टीम AM : महाराष्ट्र राज्य नगर परिषद गट – क संवर्गातील 1872 पदांकरिता मेगाभरती करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील सुशिक्षित तरुणांना शासकीय नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच, या नोकरभरतीकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

ऑनलाईन माध्यमातून शासनाच्या अधिकृत बेवसाईटवर उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत.

दरम्यान, राज्यातील विविध नगर परिषदांमधील विविध पदांकरिता 1872 रिक्त पदे भरली जाणार आहेत. दरम्यान, या नोकरभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटीची तारीख 20 ऑगस्ट असणार आहे.

महाराष्ट्र नगर परिषदच्या अधिकृत संकेत स्थळावर  mahadma.maharashtra.gov.in नवीन लिंक उपलब्ध झाली असून या लिंकवरून अर्ज करता येणार आहे.