टीम AM : बॉलिवूडच्या संजू बाबाला खरी ओळख त्याच्या नावाने नाही तर मुन्नाभाई म्हणून जास्त मिळाली. आज संजू बाबाचा वाढदिवस. बॉलिवूडला अनेक दमदार चित्रपट देणारा संजय दत्त एकेकाळी अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. अभिनेत्याला त्याच्या फिल्मी करियरमध्ये अनेक अडथळांचा सामना करावा लागला. मात्र इतके अडथळे येऊन देखील त्याने आपली बॉलिवूड इंडस्ट्रीतील ओळख कायम ठेवली.
तरुण वयात असताना संजय दत्तला काही वाईट सवय लागली होती. संजू बाबाला त्या वाईट संगतीमुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागले होते. त्यावेळी संजय दत्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ड्रग्स प्रकरणामुळे बराच चर्चेत आला होता. त्याचवेळी मुंबईच्या टाडा कोर्टाने संजयला शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत सहा वर्षांची शिक्षा सुनावली होती. तर, दुसरीकडे संजय दत्तचे अनेक अभिनेत्रींसोबत नाव त्यावेळी जोडलं होतं.
संजय दत्तला त्याच्या सिनेकारकिर्दीत ड्रग्स पायी अनेक चांगले चांगले चित्रपट गमवावे लागले होते. संजू बाबाने ‘रॉकी’ या चित्रपटातून 1981 मध्ये डेब्यू केलं होतं. या चित्रपटाच्या वेळी संजय दत्तला फारच ड्रग्जचं व्यसन लागले होते.
वडील सुनील दत्त त्यावेळी मुलाला लागलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनापायी खूपच चिंतेत होते. एकदा स्वतः संजय दत्तने आपल्या वडिलांना ड्रग्जच्या व्यसनाबद्दल सर्व काही सांगितले. त्यानंतर वडील सुनील यांनी संजयला घेऊन यूएस रिहॅबिलिटेशन सेंटर गाठलं.
संजय रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये दोन वर्षे राहिला होता. त्यावेळी त्याच्या मनात अनेकदा अंमली पदार्थाच्या नशेचाही विचार यायचा. पण, संजयने मनाचा ठाम विचार केला होता की, ड्रग्ज घेणार नाही आणि कोणाला देऊही देणार नाही.
संजयने पहिल्यांदा वयाच्या 9 व्या वर्षी सिगारेट ओढली होती. ज्यावेळी वडील त्याला भेटायला यायचे तेव्हा तो त्याच्या उरलेल्या सिगारेट तिकडेच सोडायचा. वडीलांच्या अपरोक्ष तो व्यसन करायचा. संजू बाबाला अभ्यासाची बिल्कुलच आवड नव्हती.
त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पण, वडील सुनील यांनी संजयला शिक्षणाची अट घातली होती. संजू बाबाची ही गोष्ट अनेकांना माहित नसेल, तुरुंगात असताना संजयने जेलमधल्या लोकांचे रेडिओ जॉकी बनूनही मनोरंजन केले होते.