हुमा कुरेशीचा वाढदिवस : एक हजार रूपये घेऊन आली मुंबईत, आता आहे…वाचा.. 

टीम AM : बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा आज (28 जुलै) वाढदिवस आहे. हुमा कुरेशीचा जन्म आजच्या दिवशी 1986 मध्ये दिल्लीत झाला होता. हुमा कुरेशीचा अभिनेत्री होण्याचा प्रवास खूपच मनोरंजक होता. हुमाचे बालपण दक्षिण दिल्लीत गेले. तिने दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले आणि त्यानंतर तिने थिएटर करायला सुरुवात केली. काही काळानंतर ते पद मिळवण्यासाठी दिल्लीहून मुंबईत आली. एक हजार रुपये घेऊन तिने मुंबई गाठली होती.

अनेकवेळा असे झाले की, तिला उपाशी झोपावे लागले पण तिने हार मानली नाही. ती दिल्लीत परत आली नाही आणि मुंबईत संघर्ष करत राहिली. काही वेळाने तिला सॅमसंगची जाहिरात मिळाली आणि ही जाहिरात अनुराग कश्यपने पाहिली. त्यानंतर तिचा पहिला सिनेमा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आला. या सिनेमामुळे हुमा रातोरात स्टार बनली. यानंतर तिने ‘गँग्स ऑफ वासेपूर 2’, ‘डी – डे’, ‘बदलापूर’, ‘डेढ़ इश्किया’, ‘हायवे’, ‘जॉली एलएलबी’ यांसारख्या सिनेमांमधून आपले स्थान निर्माण केले.

हुमाचे वडील सलीम कुरेशी दिल्लीत रेस्टॉरंट चालवतात. दिल्लीत सलीम नावाच्या जवळपास दहा रेस्टॉरंटची त्यांची साखळी आहे. याशिवाय हुमाने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. आज ती खूप आलिशान जीवन जगते आणि तिने जे काही मिळवले ते स्वबळावर. फिल्मी रिपोर्टनुसार, हुमा कुरेशीची 23 कोटींची संपत्ती आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हुमा कुरेशी एका चित्रपटासाठी 2 ते 3 कोटी रुपये घेते. ती जाहिरात, मॉडेलिंग आणि चित्रपटांमधून कमाई करते. तिच्याकडे SUV Land Rover, Freelander, Mercedes Benz सारख्या महागड्या गाड्या आहेत. तिला लक्झरी कारची खूप आवड आहे. हुमा कुरेशीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.