टीम AM : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात विविध प्रकारच्या आपत्तींमुळे 101 जणांचा मृत्यू झाला आहे, 13 लोक बेपत्ता असून 123 जण जखमी झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली आहे.
राज्यात गेल्या 24 तासात कोल्हापूर, यवतमाळ, नागपूर आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
पावसामुळं राज्यातले 26 हजारांहून अधिक नागरिक बाधित झाले, त्यांच्यासाठी 25 मदत छावण्या उभारल्या आहेत. या पावसाळ्यात 126 जनावरांचा मृत्यू झाला आहे, 2 घरांचं पूर्ण तर 464 घरांचं काही प्रमाणात नुकसानग्रस्त झालंय, अशीही माहिती राज्य सरकारच्या आपत्ती निवारण विभागानं दिली आहे.