अभिनेत्री श्वेता खरातचं ‘झिम्माड’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !

टीम AM : रिमझिम पावसाच्या रंगात, निर्मळ प्रेमाचा सुगंध पसरवण्यासाठी ‘ठसका म्युझिक अँड एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत ‘झिम्माड’ हे मराठी गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 

विशेष म्हणजे या गाण्यात ‘मन झालं बाजिंद’ फेम अभिनेत्री श्वेता खरातने उत्कृष्ट नृत्य सादर केलं आहे.‌ श्वेतासोबत या गाण्यात ज्येष्ठा पाटील ही बालकलाकार देखील झळकली आहे. 

सुप्रसिद्ध गायिका स्नेहा महाडीक हीने हे गाणं गायले असून, या गाण्याचे संगीतकार संगम भगत हे आहेत. तर, हे गाणं मनाली घरत हिने लिहीले आहे. ‘झिम्माड’ गाण्याचे दिग्दर्शन अक्षय पाटील यांनी केले आहे.