मणिपूर प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देवून राष्ट्रपती राजवट लागू करा : राजेसाहेब देशमुख

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे राष्ट्रपतींना निवेदन

टीम AM : मणिपूरमध्ये मागील अडीच ते तीन महिन्यापासून कुकी आणि मैतेई या दोन समुदायामध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान महिलांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा एक व्हिडीओ सोशल व वृत्त माध्यमांवर प्रसारित झाला. त्यामुळे हे प्रकरण किती गंभीर आहे, हे दिसून आले. यामुळे केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. या प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देवून मणिपुरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी केली आहे. 

बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवार, दि. 24 जुलै रोजी देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे. अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती महोदया यांना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात बीड जिल्ह्यातील जनतेच्या वतीने सदरील निवेदनाच्या माध्यमातून आम्ही अखिल भारतीय काँग्रेस कमेटी निषेध व्यक्त करीत आहोत. महिलांवर हिंसाचार करणाऱ्या व्यक्ती, कायद्याची पायमल्ली करणारे अधिकारी आणि शासन या सर्वांवर तातडीने कठोर कारवाई करावी, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देवून मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी सदरील निवेदनातून करण्यात आली आहे. 

सदरील निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, तालुकाध्यक्ष ईश्‍वर शिंदे, शहराध्यक्ष आसेफोद्दीन खतीब, राहुल मोरे, किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश गंगणे, बाळासाहेब जगताप, संजय काळे, महादेव गव्हाणे, मुक्तार बागवान, शेख अकबर, ऋषीकेश सोमवंशी, विल्यम अन्नतुल्ला, राजेंद्र गायकवाड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.