अजित पवार मुख्यमंत्री होतील : ‘या’ ज्येष्ठ नेत्याने दावा करताना तारीखही सांगितली

टीम AM : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना वक्तव्य केले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकांचा विचार केला तर भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणार नाही, कारण एकनाथ शिंदे यांचा ठाण्याबाहेर फारसा प्रभाव दिसत नाही. नुकतेच अजित पवार सरकारमध्ये सामील झाल्यामुळे भाजपाकडे मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचा पर्याय आहे. त्यामुळे येत्या 10 ऑगस्टला एकनाथ शिंदे यांच्या पक्षांबद्दल निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर अजित पवार मुख्यमंत्री होतील. 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

आगामी लोकसभा निवडणुकींचा विचार करून त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाईल, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गेल्या काही दिवसांपासून दिल्ली दौरे वाढले आहेत. तसेच पुढील काही दिवसात शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागू शकतो. त्यामुळे खरंच एकनाथ शिंदे याचं मुख्यमंत्री पद जाणार का ? आणि अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येईल का ? हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. पण राजकीय वर्तुळासोबतच सामान्य जनतेतही एकनाथ शिंदे याचं मुख्यमंत्रीपद जाणार का ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.