टीम AM : भारतीय हवाई दलात नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुण उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय हवाई दलात अग्निवीर एअर रिक्रूटमेंट अंतर्गत तरुणांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी इंटेक 01/2024 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एकूण पदांची संख्या 3500 आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार 17 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतील. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, फक्त ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अंतिमरित्या निवड झालेल्या उमेदवारांची भारतीय हवाई दलात नियुक्ती केली जाईल. अधिसूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12 वी पास असले पाहिजेत.
याचबरोबर, 27 जून 2003 ते 27 डिसेंबर 2006 दरम्यान जन्मलेल्या उमेदवारांनाच भारतीय हवाई दल अग्निवीर भरती 2023 साठी अर्ज करता येईल. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी नियमानुसार वयात सूट देण्याची तरतूद आहे. याशिवाय, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखी चाचणी, शारीरिक चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षेच्या आधारे निवड केली जाईल. तसेच, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल.
अर्ज प्रक्रिया…
– सर्वात आधी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– होम पेजवरील भरती लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक माहिती प्रविष्ट करून लॉग इन करा.
– अर्ज भरून फी भरा.
– शेवटी, फॉर्म डाउनलोड करा आणि प्रिंट करा.