धक्कादायक : ‘ट्रान्सफॉर्मर’ च्या स्फोटात 15 जणांचा मृत्यू, 7 जण जखमी

टीम AM : उत्तराखंडमध्ये मोठी घटना घडली आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या घटनेमध्ये 15 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत.

मृतांमध्ये पाच पोलिसांचा समावेश आहे. घटनास्थळावर पोलिसांनी धाव घेतली असून स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चमोली जिल्ह्याल्या अलकनंदा नदीच्या काठावर ही घटना घडली आहे. अचानक ट्रान्सफॉर्मरचा स्फोट झाला. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून 7 जण जखमी झाले आहेत. चमोलीचे एसपी परमेंद्र डोवाल यांनी सांगितले की, जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.