टीम AM : बीड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर मुलानेच जन्मदात्या बापाच्या डोक्यात लोखंडी वस्तूचा मारा करत खून केल्याची घटना बीड शहरातील अंकुशनगरमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेने बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे. आईच्या फिर्यादीवरून मुलावर खूनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सुरू आहे.
बीड शहरातील अंकुशनगर भागात राहणाऱ्या कुलकर्णी परिवारातील मुलगा सुधिर कुलकर्णी हा 2010 मध्ये ‘बीएएमएस’ मध्ये पास झाला होता. तो गेल्या तीन वर्षापासून ‘एमडी’ चे शिक्षण घेत होता. परंतू, यात त्याला अपयश आल्यानंतर तो नैराश्यात गेला होता. यात त्याने मध्यरात्री जन्मदात्या बापाचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी जात घटनेचा पंचनामा केला. फिर्यादी सुरेखा कलकर्णी (वय 62) यांच्या फिर्यादीवरुन मुलगा सुधिर कुलकर्णी (वय 38) याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करित आहेत.