टीम AM : बेळगाव जिल्ह्यातील हरकोडी येथील जैनाचार्य कामकुमार नंदी मुनी यांचा 5 जुलै रोजी रात्री निर्घृण खून करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ व या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरूवारी अंबाजोगाई शहरात समस्त जैन समाज बांधवांच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मूकमोर्चा’ काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शहरातील जैन मंदिर येथून गुरूवारी सकाळी प्रमुख मार्गावरून हा मोर्चा निघाला. या ‘मूकमोर्चा’ त माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा, डॉ. नितीन धर्मराव, रत्नाकर कंगळे, प्रकाश सोळंकी, धनराज सोळंकी, संजय सुराणा, निलेश मुथा, संतोष डागा यांच्यासह सकल जैन समाजातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.