टीम AM : शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रतेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. या निर्णयास विलंब होत होता. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाने सुुुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुुुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान सुुुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. यामुळे या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.
काय दिले सुप्रीम कोर्टाने निर्देश
सुप्रीम कोर्टात 16 आमदार अपात्र प्रकरणावर शुक्रवारी सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना नोटीस दिली. या नोटिशीचे उत्तर दोन आठवड्यात देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान हे आदेश दिले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. या खंडपीठात न्यायमूर्ती सिम्हा आणि न्या. मिश्ना यांचा समावेश होता.