अंबाजोगाईत कॉंग्रेस महागाई विरोधात आक्रमक : निदर्शने, ‘रास्ता रोको’ आंदोलन

टीम AM : देशातील वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दिनांक 12 जुलैला तीव्र निदर्शने करित ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. 

या आंदोलनात कॉंग्रेस युवकचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्यासह कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई आणि मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, कॉंग्रेसच्या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. अंबाजोगाईतील कॉंग्रेसच्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधले.