दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने 25 लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने 6 लाख रुपये केले वर्ग

डॉ. संतोष मुंडे यांची माहिती

टीम AM : शासनाने दिव्यांगांसाठी स्वनिधीतील 5 टक्के निधी राखीव ठेवा आणि तो त्याच वर्षी दिव्यांगांसाठी खर्च करा, असे आदेश ग्रामविकास विभागाने 2018 साली पारित केले होते. त्यानुसार मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यांच्या सहकार्याने बीड जिल्ह्यातील नगरपालिकांकडून दिव्यांगांना लाखो रुपयांची मदत झाल्याची माहिती धनंजय मुंडे आरोग्य मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष मुंडे यांनी दिली.

दिव्यांगांच्या खात्यात अंबाजोगाई नगरपालिकेने तब्बल 25 लाख तर परळी वैजनाथ नगरपालिकेने 6 लाख रुपये वर्ग केल्याचीही माहिती डॉ. संतोष मुंडे यांनी दिली आहे. बहुतांश ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था या दिव्यांगांच्या योजनेबाबत निरुत्साही असतात. मात्र, मंत्री धनंजय मुंडे हे सातत्याने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी संवेदनशील आहेत, सोबतच जिल्हाधिकारी दीपा मुधोळ – मुंडे यादेखील आस्थेने दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतात.

तसेच संबंधित ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड व नगर पालिकेचे मुख्याधिकारी कांबळे व मुख्यधिकारी अशोक साबळे यांनी दिव्यांगांप्रति दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठतेसाठी सर्व मान्यवरांचे डॉ. संतोष मुंडे यांनी आभार मानले आहेत. परळी व अंबाजोगाई शहरातील दिव्यांगांच्या ज्यांच्या कोणाच्या खात्यावर जर अनुदान पडले नाहीत तर डॉ. संतोष मुंडे – 9822280568 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.