प्रा. डॉ. अलका तडकलकर यांच्या शब्दघण बरसती व स्पर्श ताजवा कवितासंग्रहाचे प्रकाशन

अंबाजोगाई : अक्षर मानव अंबाजोगाई व मसाप शाखा अंबाजोगाईच्या वतीने मासिक मैफिल 10 ऑक्टोबर रोजी कम्प्युटर वर्ल्ड येथे आयोजित करण्यात आली. प्रा. डॉ. अलका तडकलकर यांच्या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी झाले. शब्दघण बरसती व स्पर्श ताजवा या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. मसाप शाखा अध्यक्ष अमर हबीब, अक्षर मानव शाखा अध्यक्षा अनिता कांबळे तसेच मसापचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य दगडू लोमटे, कमल बरुळे, अक्षर मानवचे सचिव व संवाद प्रमुख मुजीब काजी, मसाप शाखा सचिव अमृत महाजन यांच्या हस्ते कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले.

यावेळी स्पर्श ताजवा या कवितासंग्रहावर दगडू लोमटे यांनी भाष्य केले तर शब्दघण बरसती या कवितासंग्रहावर कमलताई बरुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दगडू लोमटे व कमल बरुळे यांनी डॉ. अलका तडकलकर यांच्या कांही कविता सादर केल्या. सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष अमर हबीब व या कवितासंग्रहावर भाष्य करणारे दगडू लोमटे व कमल बरुळे तसेच अंबाजोगाई संमेलनाचे अध्यक्ष गणपत व्यास, अक्षर मानवच्या शाखा अध्यक्षा अनिता कांबळे या सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर अध्यक्षीय समारोप मसाप शाखा अध्यक्ष अमर हबीब यांनी केला. त्यांनी अलका तडकलकर यांच्या एकूण साहित्याचा आढावा घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी मसाप शाखाचे, अक्षर मानवचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतोष मोहिते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.