अंबाजोगाई : तालुक्यातील झपाट्याने विकसित होणार्या घाटनांदूर या गावास नगर पंचायतचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचा शब्द विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. विधानसभा निवडणूकीच्या प्रचारार्थ धनंजय मुंडे यांनी घाटनांदूर गावात प्रचार फेरी काढून मतदारांना आवाहन केले. त्यांच्या या प्रचार फेरीला मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड, ज्येष्ठ नेते बन्सीअण्णा सिरसाट, किसनराव बावणे, दत्ताआबा पाटील, राजेश्वर चव्हाण, ज्ञानोबा जाधव, परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, देविदासराव काटे, गणेश देशमुख, सत्यजीत सिरसाट, मुसा शेख, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब देशमुख, अजितदादा देशमुख, विजयकुमार गंडले, बाळासाहेब राजमाने, कमलाकर मिसाळ, भगवान सारडा, रामभाऊ वैद्य, मुक्तार शेख, अमोल जाधव, गणेश कुसळे, श्रीनिवास आरसुडे, सुरेश जाधव, गणेश काटुळे, पाराजी वैद्य आदींसह घाटनांदूरमधील आघाडीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शिवाजी चौकातून निघालेल्या या रॅलीद्वारे संपूर्ण गावातील मतदारांशी संवाद साधण्यात आल्यानंतर झालेल्या कॉर्नर सभेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, घाटनांदूर हे आता गाव राहिले नाही तर शहर झाले आहे. या गावाला नगरपालिकेचा दर्जा मिळू शकतो. त्यासाठी पहिले पाऊल म्हणून नगर पंचायत करणे आवश्यक असून त्यासाठी आपण संधी मिळाल्यास प्रयत्न करू, जागृत सोमेश्वर देवस्थानचा पर्यटनाच्या माध्यमातून विकास करू असा शब्द मुंडे यांनी दिला. यावेळी माजी मंत्री पंडीतराव दौंड यांनीही मनोगत व्यक्त केले. या कॉर्नर सभेला मतदारांची मोठया संख्येने उपस्थिती होती.