गट तट बाजुला सारुन नमिता मुंदडांना प्रचंड बहुमताने निवडुन द्या – रमेश आडसकर

स्व. विमलताईंचे राहिलेले अपुरे काम पुर्ण करण्यासाठी नमिता मुंदडांना आमदार करा – सुरेश धस

अंबाजोगाई : माजलगावची उमेदवारी मला मिळाली त्याचे संपुर्ण श्रेय ना.पंकजाताईला जाते. आपणही आपल्या गावामध्येच राहुन पंकजाताईंचा हा आदेश आहे असे समजुन व गट तट बाजुला सारुन नमिता मुंदडा यांना प्रचंड बहुमताने निवडुन देण्याचे आवाहन रमेश आडकसकर यांनी केले. स्व. विमलताईंचे राहिलेले अपुरे काम पुर्ण करण्यासाठी नमिता मुंदडांना आमदार करा असे माजी मंत्री सुरेश अण्णा धस यांनी सांगितले.

केज मतदारसंघातील भाजपाच्या बुथ प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आडसकर व धस बोलते होते. यावेळी बोलताना आडसकर म्हणाले की, भविष्यात केजची पंचायत समिती आणि अंबाजोगाईची नगरपालिका भाजपची असणार आहे. आज देशात आणि राज्यात भाजपाचे वातावरण आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार निवडून देवुन पंकजाताईचे हात मजबुत करावेत असेही आडसकर म्हणाले. नमिता मुंदडांची उमेदवारी स्वतः ताईंनी दिलेली असल्यामुळे आपण कुठलाही विचार न करता त्यांना निवडुन द्यायचे आहे असे रमेश आडकसकर यांनी सांगितले.

मानवी जीवनातील विसरणे ही एक सर्वात मोठी कला आहे. मागील काही कटु गोष्टी झालेल्या असतील तर विसरुन जावुन केज व माजलगावच्या विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कामाला लागा,असे सुरेश धस यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा, रमेश पोकळे, मुरलीबप्पा ढाकणे, संतोष हांगे, डॉ. नेहरकर, रमाकांत मुंडे, संदीप पाटील, भगवान केदार, विष्णु घुले, ह.भ.प.रामकृष्ण घुले, राणा डोईफोडे, स्वप्नील गलधर, अक्षय मुंदडा, भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा, दिनकर चाटे, प्रगती केंद्रे यांची उपस्थिती होती.