टीम AM : लोकसभा व विधानसभा निवडणुकीबाबत विविध चर्चा होत असतानाच प्रशासनातील वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांना याबाबतचे सूचक संकेत मिळाले आहेत.
महाराष्ट्रात या दोन्ही निवडणुका मुदतपूर्व होण्याचे संकेत त्यांनी दिले असून त्या दृष्टिकोनातून निवडणूक संदर्भातील कामांना गती देण्याच्या सूचना निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
पुढील वर्षी मे महिन्यात केंद्रातील मोदी सरकारचा कार्यकाळ संपत आहे. मोदी सरकारच्या कामकाजाबाबत कुठे समाधान तर काहींकडून नाराजी व्यक्त होत आहे. पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येत आहे.
पुण्यात निवडणूक प्रशिक्षण
निवडणुकीशी संबंधित अधिकाऱ्यांना नुकतेच पुण्यात प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यात लोकसभा निवडणूक मुदतपूर्व होण्याचे संकेत अधिकाऱ्यांना देण्यात आले. नियमित वेळेत लोकसभा झाल्यास महाराष्ट्राच्या निवडणुका सोबत होतील.
त्या दृष्टिकोनातून निवडणूक कार्यक्रमाच्या प्रक्रियेला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. मतदार यादी अपडेट करून नवीन मतदार नोंदणी व इतर प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.