‘गदर 2’ : ‘ओ घर आजा परदेसी’ गाणं रिलीज, सनी देओल आणि अमिषा पटेलचा रोमँटिक अंदाज

टीम AM : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा आणि अभिनेत्री अमिषा पटेलचा 2001 मध्ये प्रदर्शित झालेला ‘गदर’ हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात.

या चित्रपटात अमिषानं सकिना ही भूमिका साकारली. तसेच सनी देओलनं ‘गदर’ चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. या चित्रपटामधील गाण्यांना आणि चित्रपटामधील डायलॉग्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. लवकरच या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘गदर – 2’ मधील ‘उड जा काले कावा’ हे गाणं नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

गाणं पहा :

‘मैं निकला गड्डी लेकर’ और ‘उड जा काले कावा’ ही ‘गदर’ या चित्रपटामधील गाणी हिट ठरली. आजही ही गाणी प्रेक्षक ऐकतात. नुकतेच ‘उड जा काले कावा’ या चित्रपटाचे नवे व्हर्जन रिलीज करण्यात आलं आहे. हे नवे व्हर्जन ‘गदर – 2’ चित्रपटात असणार आहे. ‘उड जा काले कावा’ या गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये सकिना आणि तारा सिंह यांचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना पुन्हा बघायला मिळणार आहे.

‘गदर 2’ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. ‘गदर 2’ हा चित्रपट ‘गदर एक प्रेम कथा’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. ‘गदर 2’ मध्ये सनी देओल आणि अमिषा पाटेल हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत. ‘गदर एक प्रेम कथा’ ने 22 वर्षांपूर्वी 100 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता ‘गदर 2’ हा चित्रपट किती कमाई करेल ? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.