टीम AM : मोबाईलने आपले जीवन व्यापले आहे. भारतात युपीआय पेमेंटने ऑनलाईन व्यवहार करण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की रस्त्यावरील पानवाल्याच्या टपरीपासून ते चहावाल्यांकडे गुगल पे, फोन पे किंवा पेटीएम ॲपने व्यवहार होत आहेत. त्यात आता ‘आरएफआयडी’ एटीएम कार्ड आल्यामुळे दोन हजाराखालील व्यवहारांना तुमचा पिनही विचारला जात नाही. त्यामुळे ऑनलाईन व्यवहार करताना खूपच सावधान रहाणे गरजेचे आहे. अन्यथा एका क्षणात तुमचे बॅंक खाते खाली होऊ शकते असा इशारा सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
नोटबंदीनंतर तसेच कोरोनाकाळात ऑनलाईन व्यवहाराचे चलन वाढल्याने सायबर गुन्हेगार आता गुन्ह्यांचे नवनवीन प्रकार आणि हातखंडे वापरीत आहेत. तुमची एक चुक तुम्हाला दगा फटका देऊ शकते आणि तुमचे खाते खाली होऊ शकते. तुम्हाला पाच महत्वाच्या गोष्टी सायबर तज्ज्ञांनी सुचवल्या आहेत. या पाच गोष्टी केल्यास तु्म्हाला ऑनलाईन व्यवहार करताना दगाफटका होणार नाही. त्यामुळे चला पाहूया ऑनलाईन फ्रॉडपासून कसे वाचायचे ते पाहूया..
एकाहून अधिक पेमेंट ॲप वापर टाळा
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये शक्यतो एकच पेमेंट ॲपने व्यवहार करा. जादा पमेंट एपचा वापर केल्याने तुम्हाला दगाफटका होऊ शकतो. नेहमी मोबाईलच्या प्लेस्टोअरवरुन किंवा ॲप स्टोअरवरुनच ॲप डाऊनलोड करा. नेहमी विश्वसनीय आणि वेरीफाईड पेमेंट एप्लिकेशनच डाऊनलोड करायला हवे हे लक्षात ठेवा. आरएफआयडी एटीएम कार्ड आल्यामुळे आता मोबाईलमध्ये सायबर भामटे विशिष्ट ॲप टाकून दूरवरुन तुमच्या पाकिटातील कार्डचे पैसे काढू शकतात. त्यामुळे एटीएमकार्ड, डेबिट किंवा क्रेडीट कार्ड स्टील किंवा मेटल बॉक्समध्ये ठेवणे सोयीस्कर आहे.
आपला पिन शेअर करु नका
आपला युपीआय पिन कोणाबरोबरच शेअर करु नका. अगदी तुमचे मित्र किंवा जवळच्या लोकांना युपीआय पिन सांगू नका. जर तुमचा पिन दुसऱ्यांना माहीती पडला आहे, तर तो तातडीने बदलून टाकावा. म्हणजे तुम्ही निर्धोकपणे राहू शकता.
ॲपला नेहमीच अपडेट करा
तुमच्या मोबाईलमध्ये असलेले युपीआय पेमेंट ॲप सतत अपडेट करीत रहा. त्यामुळे नवनवीन फिचर त्यात अपडेट होत रहातील. आणि त्याची सुरक्षितता देखील अपडेट होत राहील. त्यामुळे आपले युपीआय पेमेंट ॲप नेहमीच अपडेट ठेवत राहीले पाहीजे.
स्क्रीन लॉक ठेवा
केवळ स्मार्टफोनला स्क्रीन लॉक ठेवून उपयोग नाही तर आपल्या युपीआय ॲपला देखील स्क्रीन लॉक ठेवायला हवे. कारण जर तुमचा फोन चुकीच्या हातात गेला तर तुमचे अकाऊंट खाली होऊ शकते. पासवर्ड तयार करताना आपले नाव, किंवा मोबाईल नंबर किंवा जन्म तारखेचा कधीच वापर करू नका.
अनोळखी लिंकवर क्लिक करु नका
कुठल्याही आंगतुक किंवा अविश्वासार्ह लिंकवर क्लिक करु नका. तुम्हाला बक्षिसांची लॉटरी लागल्याची आमीषे दाखविणारी कोणतीही लिंक उघडू नका, तिच्यावर आपले बॅंक डीटेल्स भरु नका.