टीम AM : तेलंगणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 जून रोजी पंढरपुरात येणार आहे. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि त्यांचे सहकारी विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसंच विठ्ठूरायाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेण्यासाठी केसीआर आणि नेतेमंडळी जातील, अशी माहिती ‘बीआरएस’ चे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली आहे.
संभीजनगर (औरंगाबाद) मधील ग्रामपंचायत निवडणुकीतून ‘बीआरएस’ ने महाराष्ट्रात खातं उघडल आहे. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायतीमध्ये ‘बीआरएस’ चा उमेदवार विजयी झाला. गफूर सत्तार पठाण 115 मतांनी विजयी झाले आहेत. ‘बीआरएस’ अर्थात भारत राष्ट्र समिती हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे.
गेल्या काही दिवसांपासून केसीआर सातत्यानं महाराष्ट्रात सभा घेतायेत. या निवडणुकीच्या निमित्तानं ‘बीआरएस’ चा महाराष्ट्रात प्रवेश झाला. मराठवाड्याच्या मार्गानं ‘केसीआर’ यांचा ‘बीआरएस’ पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी पक्ष कार्यालय सुरु करत ‘बीआरएस’ पक्ष महाराष्ट्रात हातपाय पसरत आहे.