मान्सूनची जोरदार एन्ट्री : 13 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

टीम AM : केरळमध्येच उशिराने दाखल झालेला मान्सून अखेर आता सक्रीय झाला असून महाराष्ट्रातही मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. कोकणात खोळंबलेला मान्सून आता पुन्हा एकदा सक्रिय झाला असून काल पावसानं विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावली. तर आज मुंबई आणि पुण्यातही मान्सूनने जोरदार सलामी दिली. अशात पुढच्या 3 – 4 तासांसाठी राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, पालघर, ठाणे, अहमदनगर जिल्ह्यांतील निर्जन ठिकाणी 30 – 40 किमी प्रतितास वेगाने गडगडाटासह वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे.

घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी

तर येत्या 3 ते 4 तासात नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड या शहरांमध्येही मुसळधार पाऊस होईल, असा इशारा मुंबई ‘आयएमडी’ कडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.