राज्यात 4644 तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध : ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

टीम AM : राज्यात 4644 तलाठी पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ही पदभरती ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून होणार असून कुठल्याही शाखेतील पदवीधराला यासाठी 26 जून ते 17 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार असून त्याची मुदत 26 जून ते 17 जुलै 2023 आहे. यापूर्वी राज्य सरकारने वारंवार तलाठ्यांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. मात्र या भरतीला मुहूर्त मिळत नव्हता. भरती रखडल्याने भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष होता. मात्र आता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

या भरतीसाठीची परीक्षा राज्यातील 36 जिल्ह्याच्या केंद्रावर ऑनलाईन घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 900 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. संगणकावर होणारी ही परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रात आयोजित केली जाईल. प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जातील.