बँक, टपाल सेवा आता शिधा वाटप – रास्त भाव दुकानांत उपलब्ध होणार 

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

टीम AM : सर्व राष्ट्रीय आणि खाजगी बँका तसंच टपालामार्फत दिल्या जाणाऱ्या नागरी सेवा आता राज्यातल्या सर्व शिधावाटप – रास्त भाव दुकांनामधून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

राज्यामध्ये सुमारे 50 हजार शिधावाटप आणि रास्त भाव दुकानं असून त्यांचा फायदा शहरासह ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा आणि समन्वयासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात येणार असल्याचं चव्हाण म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम वाणी या उपक्रमाच्या माध्यमातून शिधावाटप दुकानांमध्ये ‘पीएम – वाणी’ संच बसवण्यात येणार असून या माध्यमातून त्या दुकानांच्या परिसरातल्या जनतेला ‘वाय – फाय’ सुविधेचा फायदा मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं.