अशोक सराफांनी केला ‘बाईपण भारी देवा’ चा ट्रेलर लॉन्च

30 जूनला होणार प्रदर्शित

टीम AM : जिओ स्टुडिओज् प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. अशोक सराफ यांच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला.

या सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, दीपा परब चौधरी, शिल्पा नवलकर, सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई पियूष उपस्थित होते.

पारंपारिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकार आणि मिडिया यांनी घेतला. जिओ स्टुडियोज् चा हा चित्रपट प्रत्येक स्त्रीला आता स्वतःसाठी जगायला शिकवणार हे नक्की.. 

जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज् निर्मित, बेला शिंदे – अजित भुरे सहनिर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित हा चित्रपट 30 जून रोजी प्रदर्शित होईल.