अंबाजोगाई जवळ भीषण अपघात : दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू

टीम AM : अंबाजोगाई – आडसकडे जाणाऱ्या रोडवर कार झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात अंबाजोगाई येथील डॉ. प्रमोद राजाभाऊ बुरांडे (वय – 39) आणि डॉ. रवी संतोष सातपुते (वय – 38) यांचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी (दि.9) दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. 

डॉ. प्रमोद बुरांडे आणि डॉ. रवी सातपुते हे दोघेही निष्णात फिजिओथेरपिस्ट होते. आडस येथील एका आरोग्य शिबिराला भेट देऊन ते कारमधून [एमएच 44 एस 3983] अंबाजोगाईकडे निघाले होते. आडस – चनई रोडवर उतारावर त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेच्या झाडाला धडकली. या अपघातात दोन्ही डॉक्टरांचा मृत्यू झाला. दोन उमद्या डॉक्टरांच्या मृत्यूमुळे अंबाजोगाईत हळहळ व्यक्त होत आहे.