नवीन संसद भवन हे 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा आणि स्वप्नांचे प्रतिबिंब : पंतप्रधान मोदी

टीम AM : नवीन संसद भवनमध्ये जे लोकप्रतिनिधी बसतील, ते नवीन प्रेरणेसोबत लोकशाहीला नवीन दिशा देण्याचे काम करतील. आपल्याकडे 25 वर्षाचा अमृतकाळ आहे. या 25 वर्षात मिळून भारताला विकसित राष्ट्र बनवायचं, लक्ष मोठं आहे, कठीण पण आहे, देशवासियांना एकत्र यायचं आहे आणि नवीन संकल्प घ्यायचे आहेत आणि नवीन गती पकडायची, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेत आणि लोकप्रतिनिधींमध्ये भरला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवीन संसद भवनाचे उद्धाटन करण्यात आले. यासोबत पंतप्रधान मोदी यांनी सेंगोल लोकसभेच्या अध्यक्षांच्या खुर्चीच्या बाजुला वैदीक मंत्रोच्चारात स्थापित करण्यात आला. या उद्धाटनाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला संबोधित केले. नवीन संसद भवनावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नवा भारत नव लक्ष तयार करतो आहे. जेव्हा भारत पुढे जातो, तेव्हा जग पुढे जातोय. हे भवन आत्मनिर्भर भारताचा साक्षिदार असल्याचे देखील मोदी यांनी म्हटले आहे.

प्रत्येक देशाच्या विकासात काही क्षण असे येतात, ते अमर होतात. आज 28 मे 2023 चा हा दिवस तसाच क्षण आहे. देश स्वातंत्र्याचा 75 वर्षाचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि देशाला नवीन संसद भवन मिळतेय. हे संसद भवन 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब आहे, असे देखील मोदी म्हणाले आहेत. नवीन संसद नवीन ऊर्जा आणि मजबूती देतेय, त्यामुळे ते नागरीकांच्या विश्वासाला उंची देणार आहे. आपल्याला नेशन फर्स्टने पुढे चालायला हवे. सतत सुधार करावा लागेल, नवीन रस्ते तयार करावे लागतील, देशाचा विकास हेच आमचं ध्येय, असे देखील मोदी म्हणाले आहेत.