प्रतीक्षा संपली : 12 वी चा निकाल 25 मे ला जाहीर होणार

टीम AM : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

बारावीचा निकाल उद्या म्हणजेच 25 मे रोजी लागणार आहे. लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं बारावीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं.

बारावीचा निकाल उद्या दुपारी 2 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर हा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात 21 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा पार पडली होती. सुमारे 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

12 वीचा निकाल ‘या’ वेबसाईट्सवर पाहता येणार

बारावीचा निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट्ससोबतच काही थर्ड पार्टी वेबसाईट्स देखील सज्ज ठेवल्या जातात. त्यामुळे खालील वेबसाईट्सवर निकाल पाहू शकाल.

http://mahresult.nic.in

http://hscresult.mkcl.org

www.mahresult.nic.in

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. www.mahahscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.