टीम AM : साराभाई वर्सेस साराभाई मालिका फेम अभिनेत्री वैभवी उपाध्याय यांचं कार अपघातात निधन झाले आहे. वैभवीच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वैभवी उपाध्याय यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगड येथील तिचे कुटुंबीय अभिनेत्रीचे पार्थिव मुंबईत आणत आहेत.
वैभवीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सीआयडी, अदालत आणि साराभाई वर्सेस साराभाई या लोकप्रिय मालिकांमध्ये तिनं आपली भूमिका बजावली आहे. साराभाई मालिकेतील जास्मीन या भूमिकेने वैभवीला विशेष ओळख निर्माण करुन दिली.