राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा : आतापर्यंत 4 जणांचे बळी

टीम AM : राज्यात उन्हाळ्याने कहर केला आहे. खान्देश, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात बहुतांश भागात पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाढत्या तापमानामुळे आजारपणं वाढली आहेत. उन्हात फिरल्यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. हवामान विभागाने राज्यात चौथ्यांदा उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. दरम्यान, राज्यात उष्माघातामुळे आतापर्यंत चार जणांचे बळी गेलेत. 

पुढील 4 ते 5 दिवस उष्णतेचा तडाखा

बंगालच्या उपसागरातील मोचा हे चक्रीवादळ बांग्लादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकल्यामुळेपश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यावर उष्णतेच्या लाटा धडकत आहेत. पुढील चार ते पाच दिवस हा तडाखा बसेल अशी शक्यता आहे.