टीम AM : चित्रपट संगीतातील ज्येष्ठ गायक मनहर उधास यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म. 13 मे 1973 जेटपूर गुजरात येथे झाला. हिंदी चित्रपट सृष्टीत पार्श्वगायक मनहर उधास यांचा संपूर्ण परिवार संगीत क्षेत्राशी निगडीत आहे. त्यांचे बंधू पंकज उधास यांना गजलचा बादशहा म्हटले जाते, तर दुसरे वडील बंधू निर्मल उधास देखील प्रसिध्द गझल गायक आहे.
या संगीतप्रेमी परिवारात जन्म घेणाऱ्या मनहर उधास यांना लहानपणा पासून गाण्याची व मोठ्या मोठ्या कलाकारांना ऐकण्याची आवड होती.
मनहर उधास यांनी भावनगर येथून मेकेनिकल इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते नोकरी साठी मुंबई येथे आले. काही काळ त्यांनी नोकरी केली. याच दरम्यान त्यांची भेट संजय लीला भंन्साळी यांच्या बरोबर झाली.
घरात संगीताचे वातावरण असल्याने त्यांनी त्यांना आपल्या आवाजाची टेस्ट करण्यास सांगितले, व पुढे संजय लीला भंन्साळी यांनी त्यांच्या कडून एक गाणे गाऊन घेतले, जे त्यांच्या ‘विश्वास’ चित्रपटासाठी होते. अशा प्रकारे इंडस्ट्रीमध्ये त्यांची एंट्री झाली.
पुढे पहिला ब्रेक मनहर उधास यांना एसडी बर्मन यांनी ‘अभिमान’ चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या बरोबर ‘लूटे कोई मन का नगर’ या गाण्याने दिला. मनहर उधास यांनी 450 हून अधिक चित्रपटात गाणी गायली आहेत. याच बरोबर त्यांनी गुजराती भाषेत अनेक गाणी गायली आहेत.
मनहर उधास यांनी अनेक साईंची भजन गायली आहेत. पण साईंच्या भजनातील एक झोली में फूल भरे हैं एक झोली में कांटे रे, कोई कारण होगा…. हे भजन त्यांचे आवडते आहे.
शब्दांकन : संजीव वेलणकर