निकृष्ट दर्जाच्या खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर करडी नजर

कृषी विभागानं भरारी पथकं केली स्थापन 

टीम AM : येत्या खरीप हंगामात वाढीव दरानं तसंच निकृष्ट दर्जाच्या खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवण्यासाठी कृषी विभागानं भरारी पथकं स्थापन केली आहेत. 

या पथकांच्या माध्यमातून दुकानांची तपासणी, शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार दोषी दुकानदारांवर कारवाईचं नियोजन केलं असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. 

शेतकऱ्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला पायबंद घालण्याच्या हेतूनं तालुकास्तरावर आठ सदस्यीय भरारी पथक कार्यरत असणार आहे. ही पथकं दोषी दुकानदारांचा परवाना रद्द करून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करणार आहेत.