टीम AM : राज्यात होणारे बालविवाह रोखण्यात राज्य महिला आयोगाला यश आल्याची, माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी आज एक चित्रफित जारी केली आहे.
परवा 10 मे रोजी लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातल्या हिरगाव, सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुक्यातील बेळकी, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यातल्या किलारवाडी आणि वाशीम इथं आज होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्यात चार मुली अल्पवयीन होत्या, या बालविवाहांना रोखण्यात यश आल्याचं चाकणकर म्हणाल्या.
एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या आजूबाजूला होणाऱ्या बालविवाहाबाबत महिला आयोगाला कळवा, असं आवाहन चाकणकर यांनी केलं आहे.