पर्यटकांनी भरलेली बोट उलटली : 22 जणांचा मृत्यू

टीम AM : केरळमधील मलप्पूरम जिल्ह्यातील तनूरजवळ पर्यटकांची बोट उलटून 22 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन सकाळी तनूर दुर्घटनास्थळी भेट देणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आज होणारे राज्यातील सर्व शासकीय विभागांचे अधिकृत कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. अपघाताच्या वेळी बोटीत सुमारे 40 लोक होते. राज्यमंत्री व्ही.अब्दुरहमान यांनी माहिती दिली की, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा अपघात रात्री उशिरा झाला.

अपघाताची माहिती मिळताच बचाव कार्यासाठी पोलीस आणि ‘NDRF’ घटनास्थळी दाखल झाले. मात्र अंधार असल्याने बचाव कार्यात अनेक अडथळे देखील येत होते. बचावासाठी टॉर्च लावून लोकांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. 

केरळमधील या घटनेवर पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान मदत निधीतून 2 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.