टीम AM : राज्यात 13 मे नंतर अनेक राजकीय घडामोडी घडतील असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय, यामागचे कारण म्हणजे 13 मे पुर्वी सत्तासंघर्षाचा निकाल लागणे अपेक्षित आहे.
मात्र, दुसरीकडे निकाल लागल्यास शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील असा दावाही राऊतांनी केला, यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
कोर्टाकडून 16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात येईल किंवा विधानसभेच्या अध्यक्षांकडे हा निर्णय सोपवतील अशी शक्यता वर्तवली जातेय, मात्र जर 16 आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घ्यायचा झाल्यास तो घेणार कोण ? असा देखील सवाल उपस्थित होतोय.