अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता

केस हायकोर्टात नेणार : राबिया खान

टीम AM : अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता केली आहे. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता. 

3 जून 2013 रोजी जिया खान हिचा मृतदेह तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. 

जियाने सूरज पांचोली विरोधात लिहिलेल्या सहा पानी पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं होतं. मात्र न्यायालयानं सूरज पांचोलीची सर्व आरोपातून मुक्तता केली आहे.

केस हायकोर्टात नेणार : राबिया खान

जिया खान मृत्यू प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाल्यानंतर जियाची आई राबिया खान भावूक झाली. यावेळी राबिया यांनी ही केस हायकोर्टात नेणार असल्याचे सांगितले. जिया खान प्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाने तब्बल 10 वर्षानंतर दिला. राबिया खान द्वारा कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांअभावी न्यायालयाने सूरजला निर्दोष ठरवले.