महाराष्ट्र दिन : ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी, आदेश जारी

टीम AM : महाराष्ट्र राज्य स्थापनेला येत्या एक मे रोजी 63 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी आठ वाजता आयोजित करण्यात यावा, असं राजशिष्टाचार विभागानं परिपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 

राज्याचा मुख्य समारंभ मुंबईत शिवाजी पार्क इथं राज्यपालांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. तसंच विभागीय आणि जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी संबंधित जिल्ह्याचे संपर्कमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील, असं यात नमूद केलं आहे. 

या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावं, यासाठी या दिवशी सकाळी सव्वासात ते नऊ या वेळांत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा समारंभ आयोजित करू नये, असं या परिपत्रकात म्हटलं आहे.