मुंबई उच्च न्यायालयाची सूचना
टीम AM : नामांतराबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत सरकारी विभागांनी औरंगाबादचं नाव बदलू नये, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयानं केली आहे.
औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांची नावं बदलण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
न्यायमूर्ती एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप व्ही. मारणे यांच्या पीठासमोर झालेल्या या सुनावणीत 10 जूनपर्यंत पोस्ट ऑफिस, ठाणे इत्यादी प्रशासकीय विभागांची नावे बदलण्याबाबत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठाला सांगितलं. पुढची सुनावणी सात जून रोजी होणार आहे.