टीम AM : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवं होतं, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
चर्चा न करता निर्णय घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही असंही पवार म्हणाले. अदानी उद्योग समूहाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची गरज नाही, मात्र विरोधी पक्ष याबाबत आग्रही असल्यास त्यांना विरोध करणार नाही, असंही पवार यांनी सांगितलं.
महाविकास आघाडीत चौथ्या पक्षाला स्थान नाही, असंही पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केलं. राजकीय व्यक्तींनी परस्परांवरची टोकाची आणि वैयक्तिक टीका टाळली पाहिजे, असं मतही पवार यांनी व्यक्त केलं.