‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे बीडमध्ये 30 एप्रिलला मराठवाडा अधिवेशन

पत्रकार, संपादकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

टीम AM : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे मराठवाडा अधिवेशन 30 एप्रिल रोजी बीड येथे पार पडत आहे. दिवसभर चालणार्‍या या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत. अधिवेशनास मराठवाडा विभागातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अधिवेशनाचे निमंत्रक ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, राज्य कार्यवाहक तथा बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर यांच्यासह इतर पदाधिकार्‍यांनी केले आहे.

मराठवाड्यातील पत्रकारांचे अधिवेशन पहिल्यांदाच बीडमध्ये होत आहे. त्यामुळे संयोजकांकडून याची जोरदार तयारी करण्यात आली आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ चे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या अधिवेशनात मराठवाड्यातील प्रमुख मंत्री, बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील दिग्गज पत्रकार देखील या अधिवेशनास उपस्थित असणार आहेत. बीड शहरातील ‘वैष्णो पॅलेस’ येथे हे अधिवेशन पार पडत आहे.

पत्रकारांच्या पाल्यांचे शिक्षण, पत्रकारांचे स्वावलंबन, पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतरचे प्रश्न, माध्यमातील बदलते तंत्रज्ञान आणि पत्रकारांच्या घरांचे प्रश्न या अधिवेशनात चर्चीले जाणार आहेत. तरी मराठवाड्यातील सर्व पत्रकारांनी या अधिवेशनासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिवेशनाचे निमंत्रक तथा राज्य उपाध्यक्ष संजय मालाणी, बीड जिल्हाध्यक्ष तथा राज्य कार्यवाहक बालाजी मारगुडे, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया, बीड जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश लिंबेकर, नांदेड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले, लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी फड, धाराशीव जिल्हाध्यक्ष हुंकार बनसोडे, परभणी जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, हिंगोली जिल्हाध्यक्ष रमेश कदम, जालना जिल्हाध्यक्ष अविनाश कव्हळे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष  देव शेजूळ यांनी केले आहे.