गळ्यात लिंबाची माळ, हातात बंदुक : पुष्पा – 2 मधील अल्लू अर्जुनचा लूक आला समोर

टीम AM : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता या चित्रपटाचा पुढचा भाग येणार असल्यामुळे सर्वजण उत्सुक आहेत.

नुकताच अल्लू अर्जुननं सोशल मीडियावर त्याचा पुष्पा – 2 चित्रपटातील लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमधील अल्लू अर्जुनच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

आज 8 एप्रिल रोजी अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याने पुष्पा – 2 चित्रपटातील लूक शेअर केला आहे. या फोटोमध्ये अल्लूने गळ्यात लिंबाची माळ घातली आहे, भरजरी साडी नेसली आहे. कानात झुमके, हातात बांगड्या असा श्रृंगार केला आहे. अल्लू अर्जुनचा हा लूक अतिशय हटके आहे. त्याच्या या लूकवरुन चित्रपटात नेमकं काय पाहायला भेटणार याचा अंदाज नेटकरी बांधताना दिसत आहेत.

पुष्पा –  2 या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी एक टीझर शेअर करण्यात आला होता. या टीझरमध्ये अल्लू अर्जुन तुरुंगातून पळून गेल्याचे पाहायला मिळाले होते. पुष्पा जंगलात कुठे तरी जाऊन बसल्याचे टीझरमध्ये दाखवण्यात आले होते. चित्रपटामधील अभिनेत्री रश्मिका मंदानाचा लूक रिव्हिल करण्यात आला होता. रश्मिकानं पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीवल्ली ही भूमिका साकारली होती.