टीम AM : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिठाच्या गिरणीत ओढणी अडकल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील होळकरनगर येथे ही घटना घडली आहे. अश्विनी बालाजी ढोपरे असे मृत महिलेचे नाव आहे.
घरात दळणयंत्रावर दळण दळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अश्विनी ढोपरे या अधिपरिचारिका पदावर काम करत होत्या. आपली ड्युटी सांभाळून त्या घरी घरगुती पिठाची गिरणी चालवत होत्या.
नेहमी प्रमाणे धान्याचे दळण दळत असताना अचानक गिरणीच्या पट्यात त्यांची ओढणी अडकली. यात त्या ओढल्या गेल्या. पट्ट्यात ओढणी अडकल्याने ओढणीचा गळ्याला फास लागला, यातच अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.