टीम AM : समाज समानतेच्या दिशेने प्रगती करत असताना पोशाखांची निवडही लिंगविरहित होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ग्रुपने देखील अशीच लिंगविरहित फॅशन स्ट्रॅटेजीनुसार परिधान करून कॉलेजमध्ये एन्ट्री करत ‘मिसमॅच डे’ साजरा केला.
‘मिसमॅच डे’ च्या दिवशी त्यांनी मनाला वाटेल तसे कपडे घातले, यात लिंगविरहीत पोषाख ही संकल्पना होती. हा व्हिडिओ सध्या जोरात व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये, विद्यार्थ्यांनी जोडीने कॉलेजात प्रवेश केल्याचे दिसत आहे. यात अत्यंत अपारंपारिक पद्धतीने पोशाख घातल्याचे दिसत आहे. एक तरुण त्याच्या मित्रासोबत शॉर्ट्स आणि फॉर्मल शर्ट घालून फिरत होता आणि त्याच्या जीन्स आणि टी – शर्टभोवती शाल गुंडाळली होती. पुढील जोडप्याने लाल स्कर्ट आणि टी – शर्ट घातला होता आणि दुसऱ्याने स्नीकर्स, मुंडू आणि शर्ट घातले होते. दुसर्या जोडीने निळ्या रंगाचा स्कर्ट आणि लांब स्कर्ट घातलेला दिसला. एकाने पांढरा टी – शर्ट, काळा जॉकीट आणि डेनिम शॉर्ट्सवर सैल टाय घातला आणि गर्दीचे लक्ष वेधून घेतले. अशाप्रकारे स्कर्ट्स, साड्या आणि टॉवेल्स अकल्पनीय सर्व गोष्टीं परिधान करत विद्यार्थी कॉलेजात आले.
‘मिसमॅच डे’ दिवसासाठी अपारंपारिक कपडे घातलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. एकाने यावर कमेंट करताना लिहिले आहे की, ‘मला आवडते की आपला देश किती मुक्त विचारांचा बनत आहे.’ दुसर्या युजरने लिहिले, ‘मुलांनो असे व्हा, आपना समय आला, चला चमकूया .’ तिसर्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘त्यांनी ज्या प्रकारे हात पकडले आहेत ते खूप गोंडस दिसत आहेत.’ साडी आणि स्कर्ट घातलेल्या मुलांचा व्हिडिओ ऑनलाइन अनेकांची मने जिंकत आहे.