आपलं सरकार हे कायद्याने स्थापन झालेलं बहुमताचं सरकार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : आपलं सरकार हे कायद्याने स्थापन झालेलं बहुमताचं सरकार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देत होते. आपण घेतलेला निर्णय लोकभावनेतून घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही घेतलेली  भूमिका ही सर्वसामान्यांची भूमिका आहे. मला खूप लोकं चांगले भेटतात. विविध क्षेत्रांमध्ये ज्यांची किर्ती आहे, ते मला नेहमी सांगतात, ज्या ज्या कार्यक्रमांमध्ये मी जातो, तिकडे सांगतात फार एकनाथराव तुम्ही धाडसी काम केलं. ते राज्याच्या हिताचं काम होतं. आणि योग्य वेळी केलं. परंतू जे केलं ते आम्ही छातीठोकपणे केलंय. या सर्वसामान्य लोकांच्या मनातलं काम केलं. या शिवसेना भाजप युतीच्या मतदारांचं मॅनडेट होतं ते आम्ही काम केलं. हिंदुत्वाची बेईमानी केली त्यांच्या विरोधात आम्ही काम केलं, असे मुख्यमंत्री म्हणाले.