धक्कादायक : कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू

टीम AM : लातूरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निलंगा – औराद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेली कार पलटी झाली, त्यामुळे हा अपघात झाला.

चाकूर येथील रहिवासी कुटुंब मुलीच्या सोयरीकीच्या कामांसाठी औरादकडे जात होते. यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने भरधाव वेगात असणारी कार पटली झाली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की कार पलटी होऊन रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पडली. जखमींना तात्काळ निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भगवान मारोती सावळे, विजयमाला भाऊराव सावळे, लता भगवान सावळे, राजकुमार सुधाकर सावळे यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अचानक काळाने घाला घातल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.